Good News! 'या' महिन्यांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र होणार अनलॉक; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

Good News! 'या' महिन्यांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र होणार अनलॉक; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती






टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होणार आता लॉकडाऊनचा विषय राहिला नाही असे स्पष्ट मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले असून RTPCR टेस्टचा रेट 800 रुपयांपर्यंत आणल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.अहमदनगर येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री उशिरा पत्रकारांशी सवांद साधला.   


कोरोना व्हायरसवर अजून लस आलेली नाही, त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे असे राजेश टोपे म्हणाले. राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करूया असं वक्तव्य टोपे यांनी केलं.




कायद्याच्या अनुषंगाने धूळ फेकण्याची काम काही चॅनल्सने केला. त्यामुळे त्यांच्यावर कठोरतील कठोर शिक्षा होण्याची गरज असल्याचं राजेश टोपे म्हणाले. 




आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीआरपी प्रकरण तसंच भाजपवर देखील टीका केली.   'काही न्यूज चॅनलच्या टीआरपी संदर्भात दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.




The whole of Maharashtra will be unlocked by November; Rajesh Tope

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा