थरारक! सोलापूर 'या' गावात पूर्ववैमनस्यातून भरदिवसा युवकावर गोळीबार - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

थरारक! सोलापूर 'या' गावात पूर्ववैमनस्यातून भरदिवसा युवकावर गोळीबार

 





टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर (ता. माळशिरस) येथे भरदिवसा एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.




वेळापूर (ता. माळशिरस) येथे पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची घटना (सोमवारी) घडली. सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास अकलूज-सांगोला रोडवर डॉ. नाईक हॉस्पिटलसमोर ही घटना घडली.याबाबत वेळापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.


वेळापूर पोलिसांनी दिलेली माहिती, अशी फिर्यादी भाऊसाहेब मच्छिंद्र मगर (वय 28, रा. निमगाव मगराचे, ता. माळशिरस) हे  सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास नाईक हॉस्पिटलसमोर मेहुणा कृष्णराव सुभाष चव्हाण (वय 29) याच्याशी गप्पा मारत थांबले होते. 




यावेळी विमूल नामदेव पोरे (रा. वेळापूर) हा तेथे आला. विमूलने पूर्ववैमनस्यातून भाऊसाहेब मगर व कृष्णराव चव्हाण यांच्यावर गोळी झाडली.


मात्र ते खाली वाकल्याने त्यांना गोळी लागली नाही. विपूल पोरे याने त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर विपूल पोरे हा पळून गेला. 


त्याच्यावर वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव हे करीत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या.




Firing from Purvaimanas in Velapur in Malshiras taluka


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा