सोलापूर विद्यापीठ आजपासून अंतिमच्या परीक्षेची वेळ 'अशी' असणार; नवे हेल्पलाईन नंबर जारी - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

सोलापूर विद्यापीठ आजपासून अंतिमच्या परीक्षेची वेळ 'अशी' असणार; नवे हेल्पलाईन नंबर जारी

 





टीम मंगळवेढा टाईम्स । पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा आज 9 ऑक्‍टोबरपासून पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत होतील व इतर सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत होतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी दिली.



रीक्षार्थीनी परीक्षा देण्यासाठी विद्यापीठाच्या पोर्टलवर परीक्षा असतानाच लॉगिन करावे. त्याचबरोबर ऑफलाइनची परीक्षा देखील दोन सत्रात होईल. परीक्षार्थींसाठी नव्याने हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आले आहे.




यामध्ये सकाळच्या सत्रासाठी वेगळे नंबर तर दुपारच्या सत्रासाठी वेगळे नंबर आहेत. त्या-त्या सत्रातील परीक्षा वेळीच अडचण आल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या नंबरवर फोन करून संवाद साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


परीक्षांची वेळ अशी


शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या इंजिनिअरिंग, फार्मसी व आर्किटेक्‍चर या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांची वेळ बदलण्यात आली असून या परीक्षा दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत होतील.




इतर सर्व परिक्षांची वेळ 10 ते दुपारी 3 या वाजेपर्यंत राहील. विद्यार्थ्यांनी आपल्या नियोजित वेळीच लॉगिन करावे. तांत्रिक कारणामुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल झालेला आहे, याची सर्व विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी व पालकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे.


हेल्पलाइन नंबर:


सकाळचे सत्र :-

अलदार- 8421488436, गुंडू- 8421401886, धाकडे- 8421268436, भंडारे- 8421528436, गंगदे- 8421068436, मोटे- 8421238466, मुछाले-8421478451, टिक्के- 8010093831, पांढरे-8010462681.


दुपारचे सत्र:-

खंडागळे- 8421228432, देशमुख- 8421638556, शेख- 8421958436, चव्हाण- 8421678436, कोरे- 8421905623, लटके- 8421908436, कोळी- 8421840456, बचुवार- 8421354532, टिक्के- 8010093831, पांढरे-8010462681.


या हेल्पलाइन नंबरवर सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांनी फोन लावून आपले शंकेचे निरसन करावे.




Solapur University Final Exam Time will be from today;  New helpline number issued

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा