काहीसा दिलासा! सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 138 जण कोरोना पॉझिटिव्ह, 'या' गावातील पाच बळी - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

काहीसा दिलासा! सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 138 जण कोरोना पॉझिटिव्ह, 'या' गावातील पाच बळी

 





टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला आज काहीसा दिलासा मिळाला आहे. आज केवळ 138 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

मागील काही महिन्यांपासून आज आढळून आलेली संख्या ही खूपच कमी असल्याचे अहवालावरुन दिसून येते.



आज एकूण 2 हजार 63 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 925 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 138 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज 258 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडले आहे.


आज बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते. याशिवाय आज कोरोनाने पाच जणांचा बळी घेतला आहे. 


सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या आता 26 हजार 674 एवढी झाली आहे.


तर 730 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे अद्यापही पाच हजार सहा जण वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत.कोरोनामुक्त होऊन 20 हजार 938 जण आपापल्या घरी सुखरूप पोहोचले आहेत.(सकाळ)


आज 'या' गावातील पाच जणांचा मृत्यू


मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील 57 वर्षाचे पुरुष, देवकते वस्ती कुर्डूवाडी (ता. माढा) येथील 67 वर्षाचे पुरुष, अलीपूर रोड बार्शी येथील 72 वर्षाचे पुरुष, पाटकुल (ता. मोहोळ) येथील 80 वर्षाची महिला तर चांदापुरी (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.




Solapur district rural areas of , 138 people tested positive for corona today

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा