प्रशासनाला यश! सोलापूर ग्रामीणमध्ये आज 434 जण कोरोनामुक्त; 216 नवे पॉझिटिव्ह - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

प्रशासनाला यश! सोलापूर ग्रामीणमध्ये आज 434 जण कोरोनामुक्त; 216 नवे पॉझिटिव्ह

 





टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची आकडेवारी रोखण्यात प्रशासनाला यश मिळत असुन आज फक्त 216 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.त्याचबरोबर ग्रामीण भागातील तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 434 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.


आज  2 हजार 127 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 911 अहवाल निगेटिव्ह आले असून 216 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.




सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 27 हजार 393 झाली आहे. ग्रामीण भागातील 750 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 4 हजार 698 जणांवर उपचार सुरू आहेत.


आतापर्यंत 21 हजार 945 जण कोरोना मुक्त झाले आहेत. आजच्या अहवालात मयत दाखविलेल्या तीन व्यक्तींमध्ये पंढरपूर तालुक्‍यातील फुलचिंचोली येथील 70 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील माळखांबी येथील 70 वर्षीय महिला आणि माळशिरस तालुक्‍यातील वेळापूर येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.




कोरोना चाचणीचे अद्यापही 69 अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना चाचण्या अधिक होत असल्याने ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढत आहे.

नेहमीच्या तुलनेत आज मृतांची संख्या कमी झाल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ऍक्‍टिव्ह रुग्णांचीही संख्या आता कमी होऊ लागली आहे.




Solapur rural 434 corona-free today;  216 New Positive

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा