लाईट बिल माफ करण्याबाबत छावा संघटना आक्रमक; आंदोलनाचा दिला इशारा - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

लाईट बिल माफ करण्याबाबत छावा संघटना आक्रमक; आंदोलनाचा दिला इशारा

 



टीम मंगळवेढा टाईम्स । अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना मंगळवेढा शहर व तालुका यांच्या वतीने लाॅकडाऊन काळातील  मार्च 2020 ते आॅगस्ट 2020 या काळातील संपुर्ण लाईट बिल माफ करण्याबाबत उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मंगळवेढा येथे निवेदन देण्यात आले आहे.





सध्या जगात व देशात कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीचे सुरु आहे.सदर कोरोना काळात अनेकांना दोन वेळेचे जेवण मिळत नाही.कोणाच्या हाताला काम नाही त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकणे अतिशय जिकरीचे झालेले आहे अश्या भयानक परिस्थितीत सर्वसामान्य जनतेस विज बिल भरणे मुश्किल झालेले आहे.




सदर गंभीर समस्येचा विचार करुन मागील सर्व विज बिल माफ करावे.अन्यथा आम्ही छावा स्टाईलने अंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.




यावेळी जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड,शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष जमीर इनामदार, तालुकाध्यक्ष सुरज फुगारे,शहराध्यक्ष  सागर वाघमारे,वि.आघाडी शहराध्यक्ष सचिन वडतिले, वाहतूक संघटना नागेश नरोटे,दिपक हेबांडे,रमेजराजा मुल्ला, गणेश गायकवाड, शरद पवार आदीजन उपस्थिती होते.




Chava organization aggressive about light bill waiver;  Warning of agitation

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा