टीम मंगळवेढा टाईम्स ।पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांची पुणे जिल्ह्यातील खेड येथे बदली झाली असून त्यांच्या जागी आता चंद्रपूर ते निलेश गोंड यांची पंढरपूर तहसीलदार म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
वैशाली वाघमारे यांच्या बदलीचे आदेश काल रात्री उशिरा निर्गमित झाले, येत्या दोन दिवसात ते आपल्या पदभार सोडणार आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड हे सह्याद्रीच्या टापूतील महसूली उत्पन्न देणारा सर्वात मोठा तालुका असून अत्यंत जबाबदारीच्या ठिकाणी त्यांची बदली झाल्याचे मानले जाते.
वैशाली वाघमारे यांची कारकीर्द सुमारे एक वर्ष भराची राहिल यामध्ये महापूर बाधितांना नुकसानभरपाईचे वाटप , तसेच कोरोना काळामध्ये अन्नधान्य वाटप आणि गाव निहाय नियोजन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती तथापि वाळूचोरी आणि अवैध वाहतुकीबाबत देखील या वर्षभरात बराच गदारोळ झाला.
नवे येणारे तहसीलदार दौड यांच्याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील अनुकूल असल्याचे सांगितले जाते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा