दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! लेखी परीक्षेनंतर होणार प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, ११ मार्च, २०२१

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! लेखी परीक्षेनंतर होणार प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा

 



टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रातील औरंगाबाद, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनची तयारी सुरु केली आहे. या पार्श्‍वभूमीवर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेणे कठीण मानले जात आहे. 



पालक, शिक्षकांनीही त्याबाबत चिंता व्यक्‍त केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेनंतर घ्याव्यात आणि त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारू नये, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज सर्व शाळांना दिल्या.


राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने 14 मार्च रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.


तत्पूर्वी, राज्यातील पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वीच शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप आटोक्‍यात आला नसल्याने शाळा आणखी काही दिवस बंदच ठेवण्यात येणार आहेत. 


बारावीची परीक्षा 23 एप्रिलपासून तर दहावीची परीक्षा 29 एप्रिलपासून सुरु होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर दहावी-बारावीचे वर्ग सुरु ठेवण्यात आले आहेत.



विद्यार्थ्यांना परीक्षेत अडचणीत येणार नाही हा त्यामागे हेतू आहे. परंतु, कोरोनाचा जोर वाढू लागल्याने परीक्षेसंदर्भात पालक, विद्यार्थी व शिक्षकांच्या अडचणी सोडविण्याच्या हेतूने शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र सल्लागार समिती नियुक्‍त केली आहे. 


या समितीची मागील सहा दिवसांत गुरुवारी दुसरी बैठक पार पडली. या बैठकीसाठी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवा वंदना कृष्णा, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर व उपसंचालक विकास गरड आदी उपस्थित होते. 


यावेळी पालकांचे मत विचारात घेऊन शालेय शिक्षणमंत्र्यांनी संबंधित विभागाला तशा सूचना दिल्या आहेत.






शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या...


भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांच्या पेपरमध्ये असणार पुरेशा दिवसांचे अंतर

प्रतिबंधित क्षेत्र व लॉकडाउन तथा कोरोनाचा वाढलेल्या प्रादुभार्वामुळे लेखी परीक्षानंतर होणार प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा

पालकांनी परीक्षा व विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडे सूचना पाठवाव्यात

सह्याद्री वाहिनीवरील दहावी-बारावीच्या तासिका वाढणार; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मिळेल प्रश्‍नसंचिका

पालक संघटना, शिक्षकांनी शासनासोब एकत्रित येऊन परीक्षा घेण्यासंदर्भात ठोस नियोजन करावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा