टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथे सोलापूर रोडवरील हिंदू स्मशानभूमीत नगरपरिषदेने जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त करून गॅस शवदाहिनी बसविलेली असून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सोलापूर यांचेकडून तांत्रिक तपासणी करून रविवारी सदर गॅस शवदाहिनी सुरू करण्यात आली असून कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यात आला.
गॅस शवदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार मोफत करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी सांगितले.
सदर अंत्यसंस्कार करतेवेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, पक्षनेते अजित जगताप, बांधकाम समिती सभापती प्रविण खवतोडे , अभियंता अजय नरळे,आरोग्य निरीक्षक विनोद सर्वगोड, विठ्ठल कांबळे व मृताचे नातेवाईक उपस्थित होते.
सदर गॅस शवदाहिनी सुरू करणेसाठी नगराध्यक्षा अरूणा माळी,उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले सर्व नगरसेवकांनी प्रयत्न केले.
जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर करून गॅस शवदाहिनी सुरू झाल्याने मंगळवेढेकरासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याने कोरोनाचे मृतदेहाचा अंत्यसंस्कार गॅस शवदाहिनीमध्येच करावा असे आवाहन जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप यांनी केले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल 'मंगळवेढा टाईम्स'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा