टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात व परिसरात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून या रुग्णसंख्याला आला आळा घालण्यासाठी नगरपालिका व स्थानिक व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंगळवेढा नगरपरिषदेत मंगळवेढा शहर व परिसरातील दोन ग्रामपंचायत हद्दीतील व्यापारी, पदाधिकारी व न.पा. प्रशासनाची संयुक्त बैठक रविवारी सायंकाळी ५.०० वा. मंगळवेढा नगरपरिषदेत होवून सोमवार दि.१९ एप्रिल रोजी रोजी सायंकाळी ५.०० वाजल्यापासून ते मंगळवार दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत एक आठवडयाचा जनता कर्फ्यू पाळण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
मंगळवेढा शहर, संत आठवडयाचा जनता चोखामेळा नगर व संत दामाजी नगर ग्रामपंचायत हद्दीत तसेच तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सदरचा निर्णय घेण्यात आला.
जनता कर्फ्यू काळात सर्व दुकाने बंद राहतील.मात्र मेडिकल व हॉस्पीटल यांना वेळेचे बंधन असणार नाही. दूध सकाळी ७.०० ते १०.०० व सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत सुरु राहिल तर भाजीपाला व फळे यांना फिरून विक्री करण्यासाठी परवानगी असेल.
सोमवारी एक दिवसच किराणा दुकान सायंकाळी ५ पर्यंत उघडी राहतील. त्यानंतर एक आठवडा बंद राहील. आठवडा बाजार बंद आहे, मार्केट यार्डमध्ये भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी कोणी बसणार नाही याची भाजीपाला व फळे विक्रेते यांनी नोंद घ्यावी.
सध्या मंगळवेढा शहरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्या कारणाने सर्व व्यावसायिक व नागरिकांनी दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल 'मंगळवेढा टाईम्स'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा