मंगळवेढयात शेतकऱ्याचे घर भरदुपारी फोडले, 53 हजाराचा मुद्देमाल लंपास; अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१

मंगळवेढयात शेतकऱ्याचे घर भरदुपारी फोडले, 53 हजाराचा मुद्देमाल लंपास; अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल

 


टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथे भर दुपारी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरटयांनी लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने,रोख रक्कम असा एकूण 53 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली असून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.


पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की,यातील फिर्यादी बाळासाहेब राजेंद्र कांबळे  (वय 27 रा.रड्डे) हे आई द्रौपदी व चुलते उत्तम कांबळे असे सगळे मिळून घराला कुलूप लावून दि.3 रोजी सकाळी 9.00 वा. शिरनांदगी शिवारात असलेल्या शेताच्या कामाकरीता गेले होते. 


ही संधी साधून चोरटयांनी घराचा कडी कोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून 


त्यात ठेवलेले सोन्याचे झुबे,वेल,बदाम,बोरमाळ,अंगठी असा 50 हजाराचा मुद्देमाल तर 3700 रुपयांच्या रोख चलनी नोटा असा 


एकूण  53 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला असल्याची फिर्याद दाखल झाली असून याचा अधिक तपास पो.हे.कॉ.जाधव हे करीत आहेत.


अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा - 9970766262

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा