टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथून विषबाधेने दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत उमेश सुभाष भुसे, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी फिर्यादी दिली असून संतोष लहू कोंडूभेरी व आकाश धोंडीराम फुगारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.20 डिसेंबर रोजी संध्यकाळी 8 च्या सुमारास श्रीखंड, बासुंदी, रबडी व पनीर हे अन्न पदार्थ यातील साक्षीदार यांनी समर्थ डेअरी मंगळवेढा येथून खरेदी केले होते.
ते त्यांनी त्याच रात्री 9 ते 9.30 च्या सुमारास घरातील सर्व सदस्य आबा दगडू चव्हाण (वय.३७) पत्नी सुषमा आबा चव्हाण (वय.36) मुलगी कु.भक्ती आंबा चव्हाण (वय 6) दुसरी मुलगी कु. नम्रता आबा चव्हाण (वय 4), वडील दंगडू यल्लाप्पा चव्हाण (वय 70) वर्ष यांनी सर्वांनी
श्रीखंड , बासुंदी , रबडी खाल्ली त्यानंतर दुसऱ्या दिवशी 21 डिसेंबर रोजी पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान उलटी, जुलाब, मळमळ, पोटदुखी हा त्रास होऊ तात्काळ चौघेजण उपचार करिता पवार बाल रुग्णालय तुकाई नगर मंगळवेढा येथे दाखल झाले.
त्या नंतर डॉ.देवदत्त पवार यांनी तपासून उपचार केले. त्यानंतर प्रकृती ठीक वाटल्याने संध्यकाळी सर्व 4 जणांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर 22 डिसेंबर रोजी उलटी जुलाब यांचा त्रास वाढल्याने दुपारी 4 वा. डॉ.पवार यांच्याकडे गेले त्यांच्याकडे उपचार व औषधे घेऊन घरी आले.
त्यानंतर दि.23 डिसेंबर रोजी पहाटे 1 ते 1.30 च्या सुमारास त्रास जास्त होऊ लागल्याने यातील मयत कु.भक्ती चव्हाण व कु.नम्रता चव्हाण यांना डॉ.पवार यांच्याकडे घेऊन गेले त्यांनी भक्ती चव्हाण हिस दामाजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंगळवेढा येथे पाठवले.
तसेच आबा चव्हाण यांना ही उपचारासाठी दाँमाजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मंगळवेढा येथे नेले. तर कु.नम्रता चव्हाण हिस नवजीवन बाल रुग्णालय, सरगम चौक पंढरपूर येथे पुढील उपचारास पाठवले.
त्यानंतर दामाजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मंगळवेढा यांनी कु.भक्ती चव्हाण हिस दि.23 डिसेंबर रोजी पहाटे 02:00 ते 2:30 वाजताच्या सुमारास मयत घोषित केले.
त्यानंतर कु.नम्रता चव्हाण हिस दि.24 डिसेंबर रोजी पहाटे 1 ते 1.30 च्या सुमारास डॉ.शहा, नवजीवन बाल रुग्णालय, सरगम चौक, पंढरपूर यांनी मयत घोषित केले.
म्हणून अन्न विषबाध प्रथम दर्शनी तपासावरून दुग्धजन्य पदार्थामधून झाले असल्याच्या संशयावरून संतोष लहू कोंडूभेरी व आकाश धोंडीराम फुगारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे हे करीत आहेत.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 कलम 59 व भा.द.वी मधील 272,273 ) कलमानुसार, मंगळवेढा पोलीस ठाणे भाग 05 गुरने 863/2021 अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व नियमन 2011 मधील कलम 3 ( 1 ) ( a ) 3 ( 1 ) ( zz ) ( v ), 23 ( 1 ). 23 ( 2 ) , 26 ( 1 ), 26 ( 2 ) ( 1 ) 26 ( २ ) ( 5 ) 27 ( 3 ) ( e ) तसेच नियमन 2011 चे 1.2.1.2.2 उल्लंघन केले असल्याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा