मंगळवेढ्यातील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

मंगळवेढ्यातील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारिरीक छळ करणाऱ्या पतीकडून वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती,सासू,सासरे व मामा मामी विरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना दि.२४ डिसेंबर रोजी चिखली येथील निवाली वस्ती येथे घडली होती.



कोमल प्रवीण देवकर (वय -२१ रा.भाळवणी ता.मंगळवेढा/ निवाली वस्ती चिखली) असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव आहे.

याप्रकरणी तिचा पती प्रवीण भारत देवकर (वय-२८) याच्या सह भारत सोपान देवकर,राजाबाई भारत देवकर, महादेव मोरे व सुवर्णा मोरे (रा.भाळवणी ता.मंगळवेढा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर सुनील भाऊसाहेब आसबे (वय-४५रा. आसबेवाडी ता.मंगळवेढा) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल आणि प्रवीण यांचे ५ महिन्यापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर चिखली येथील निवाली वस्ती येथे राहत होते. दरम्यान, पती प्रवीण याने पत्नी कोमल हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच संसार चालवण्यासाठी पैशाची मागणी केली,तिच्यावर पैसे चोरीचा आळा घेऊन तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला, पतीकडून होत असलेल्या वारंवार त्रासाला कंटाळून कोमल हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येस तिचा पती प्रवीण व वरील सर्व जबाबदार असून सर्वानीच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्य़ाद कोमलच्या वडीलांनी दिली. त्यानुसार चिखली पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षीका रत्नमाला सावंत या करीत आहेत.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा