मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
विवाहित महिलेस तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी अमर गोरख गायकवाड (रा.ढवलस ता.मंगळवेढा) याच्याविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि २४ डिसेंबर रोजी रात्री ८ सुमारास पीडित महिलेचा पती कामावरून घरी आला असता. त्याच्यापाठोपाठ त्यांच्या भावकीतील आरोपी अमर गायकवाड हा सुद्धा घरात आला.

पीडित महिलेने तिच्या पतीस पाणी पिण्यास तांब्या भरून दिल्यावर पती चूळ भरत बाहेर थुंकत असताना अमर गायकवाड याने पीडित महिलेस मानेने खुनवुन मनाला लज्जास्पद वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भा.द.वि कलम ३५४,३२३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक दीपक घोंगडे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा