मंगळवेढ्यात पारधी समाजाचे बेमुदत धरणे आंदोलन मोरे कुटुंबियांच्या वतीने निष्ठांत भोजन - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १५ जानेवारी, २०१९

मंगळवेढ्यात पारधी समाजाचे बेमुदत धरणे आंदोलन मोरे कुटुंबियांच्या वतीने निष्ठांत भोजन


  • बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा👇
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

शासनाने गावठाणामध्ये कायमस्वरूपी राहण्याकरिता जागा देवून सरकार दप्तरी त्या उतार्‍यावर नावाची नोंद करावी या मागणीसाठी आदिवासी हिंदु पारधी समाजाच्या महिला व पुरूष गुरूवारपासून तहसिल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून आज सहाव्या दिवशी भीमराव मोरे यांच्या कुटुंबियांच्या वतीने निष्ठांत भोजन देण्यात आले.

भारतीय राज्यघटनेनुसार अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा असून भारतीय राज्यघटने नुसार देशात कोठेही संचार व वास्तव्य करण्याचे सर्वांना स्वातंत्र्य आहे. हा समाज पूर्वीपासून गावोगावी भटकंती करून व भिक्षा मागून कुटूंबाची उपजिवीका करत असून त्यांच्या नावावर कोठेही घर, घरजागा अथवा शेतजमिन नसल्यामुळे त्यांना रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान नोंदणी तसेच शासनाच्या अन्य योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.

तसेच त्यांच्या मुला-मुलींनाही शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. खडकी येथे गट नं.52/2 या सरकारी गावठाणामध्ये सदरच्या महिला वास्तव्य करून राहत असून तेथे त्यांना रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान नोंदणी कार्ड आदी गोष्टींपासून तसेच शासनाच्या अन्य योजनांपासून वंचित रहावे लागत असून ते राहत असलेल्या जागेवर सरकार दप्तरी जाणीवपूर्वक व जातीय मानसिकतेतून कोठेही नोंद केली जात नाही. तरी त्यांना खडकी येथील गावठाणामध्ये कायमस्वरूपी राहण्याकरिता जागा देवून या जागेच्या उतार्‍यावर सरकार दप्तरी त्यांच्या नावाची नोंद करावी अन्यथा गुरूवार दि.10 जानेवारीपासून तहसिल कार्यालयासमोर सहकुटूंब बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार पारधी समाजाने धरणे आंदोलन सुरू केले असुन आज मंगळवारी ६ व्या दिवशी भीमराव मोरे यांच्या वतीने भोजन ददेण्यात आले.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा