मंगळवेढ्यात दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळल्याने खळबळ - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २० जानेवारी, २०१९

मंगळवेढ्यात दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळल्याने खळबळ



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील जालिहाळ येथे व खोमनाळ रोडवरती अनोळखी दोन इसमाचे मृतदेह आढळून आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

जालिहाळ येथील सचिन चौगुले यांच्या शेतामध्ये रोडच्या बांधालगत एका अनोळखी पुरुषाचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शनिवारी रात्रीच्या सुमारास सापडला आहे. अंदाजे पस्तीस ते चाळीस वयाच्या पुरुषाचा हा मृतदेह असून त्याच्या डोक्यावरील केस गळून पडलेले आहेत. कवटीचा व दाताचा सांगाडा दिसत आहे. त्यातून आळ्या बाहेर येत असून प्रेत कुजलेल्या अवस्थेत दिसत असल्याने साधारण १० दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता आहे.त्याच्या अंगात निळसर रंगाचा शर्ट असून राखाडी रंगाची नाईट पॅन्ट आहे.

तर दुसरीकडे मंगळवेढा-खोमनाळ रोडवरील बापू वटारे यांच्या शेताजवळ रोडलगत जवळच अंतरावर एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह शनिवारी रात्रौ १०.३०च्या सुमारास सापडला आहे. या व्यक्तीच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट आहे.उजव्या हाताच्या पोटरीवर S नाव असे गोंदलेले आहे.


मृतदेहांची ओळख अद्याप पटली नसून सदरचा मृतदेह मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आली आहे. मृत व्यक्तीसंदर्भात कोणास अधिक माहिती मिळाल्यास तातडीने मंगळवेढा पोलीस स्टेशनला ०२१८८-२२०३३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अनिल गाडे व पोलीस हवालदार समाधान पाटील यांनी केले आहे.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा