मंगळवेढ्यात दै.दामाजी एक्सप्रेस परिवाराकडून शहिदांसाठी 11 हजार रूपयांची मदत - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

मंगळवेढ्यात दै.दामाजी एक्सप्रेस परिवाराकडून शहिदांसाठी 11 हजार रूपयांची मदत

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांसाठी दै.दामाजी एक्सप्रेस परिवाराने 11 हजार रूपयांची मदत दिली आहे.

मंगळवेढा येथील व्यापारी महासंघ व माजी सैनिक संघटनेने शहिदांसाठी मंगळवेढयातून मदतफेरी काढली असून या मदतफेरी दरम्यान दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे यांनी सदरची मदत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांचेकडे सुपूर्द केली.

यावेळी व्यापारी महासंघाचे सचिव अरूण किल्लेदार, दामाजी एक्सप्रेसचे कार्यकारी संपादक प्रकाश जडे, उपसंपादक बाळासाहेब नागणे, साप्ताहिक संपादक संघटनेचे अध्यक्ष समाधान फुगारे, माजी सैनिक मुरलीधर घुले, महादेव दिवसे, चंगेजखान इनामदार, सय्यद इनामदार, व्यापारी महासंघाचे सतिश हजारे, मारूती काळुंगे, सुरेश कनुरे, प्रतिक किल्लेदार, शिवराज पट्टणशेट्टी, हिरालाल तांबोळी, विश्वास माळी आदि उपस्थित होते.













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा