मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा बस स्थानकात ८० वर्षीय वृद महिलेचा मृतदेह आढळला आहे.नागाव्वा अप्पा हेगडे (रा.नंदूर ता.मंगळवेढा) असे नाव असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.बस स्टँड परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मंगळवेढा बस स्थानकाची स्वच्छता करीत असताना एका महिलेस ही वृद्ध महिला झोपलेल्या अवस्थेत आढळुन आली.
त्या वृद्ध महिलेस उठवण्याचा प्रयत्न केला असता ती मयत झाली असल्याचे निदर्शनास आढळून आले सदरची खबर मंगळवेढा पोलिसात दिली असता घटनास्थळी पोलीस नाईक विकास क्षीरसागर, कुंभार यांनी भेट दिली.
अधिक तपासणी केली असता त्या वृद्ध महिले जवळ सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पासबुक मिळाले त्यावरून तिची ओळख पटली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा