मंगळवेढ्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

मंगळवेढ्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारुड्या नवऱ्याने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवेढा तालुक्यातील डोणज हद्दीत सोमवारी रात्री ही थरारक घटना घडली. सखुबाई महादेव गायकवाड असे मृत महिलेचे नाव असून आरोपीचे नाव महादेव श्रीमंत गायकवाड आहे. घटनेनंतर पती पसार झाला असून याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी महादेव गायकवाड याने राहत्या घरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला लाकडी दांडक्याने व धारदार हत्याराने तिच्या गालावर कपाळावर डोक्याजवळ मारून जखमी करून गळा आवळून तिचा खून केला आहे.सदर घटनेनंतर आरोपी महादेव गायकवाड याने राहत्या घराला बाहेरून कुलूप लावून पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा