मंगळवेढ्यात दिवसाढवळ्या बिबट्यांचा वावर, शेतकरी, विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

मंगळवेढ्यात दिवसाढवळ्या बिबट्यांचा वावर, शेतकरी, विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली


                        बिबट्या च्या पाहुलखुना

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-

मंगळवेढा तालुक्यातील ढवळस  परिसरातील गायरान वसाहत ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्या फिरत असल्याने शेतकरी शेतमजूर शालेय विद्यार्थी यांनी बिबट्यांंची दहशत घेतल्याने संपूर्ण परिसर भीतीच्या सावटाखाली वावरत आहे.




ढवळस परिसरात आज सकाळी ७.३० च्या सुमारास बिबट्या दिसल्याने बोलले जात आहे. पाच शेतकऱ्यांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगत असून त्याच्या पायाचे वन ही तिथे पहावयास मिळाले असून बिबट्याने आत्तापर्यंत कोणालाही हानी पोहचवलेली नाही.

गायरान वस्तीवरील पप्पूशेठ नामदेव मोरे हे जनावरांना चारा आणण्यासाठी गेले असता खारा ओढ्याजवळ बिबट्या दिसल्याने त्यांनी आरडाओरडा केल्याने सिताराम आत्माराम मोरे, रमेश नामदेव मोरे ,भाऊसाहेब व्हनवटे आदींना बिबट्याचे दर्शन झाले आहे.




ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. संबंधित विभागाने याची दखल घेत ढवळस परिसरात पिंजरा लावावा.बिबट्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. शेतकरी मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे हादरून गेले आहेत.या भागात बिबट्या नसावा, बिबट्यासदृश तरस असावा असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा