पाटखळ येथे आज आर.पी.आय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

पाटखळ येथे आज आर.पी.आय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-

सोलापूर जिल्ह्यातील आर.पी.आय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक आज पाठखळ येथे दुपारी २ वा.आयोजित करण्यात आली असल्याची माहिती तालुका अध्यक्ष अशोक शिवशरण यांनी दिली आहे.



याप्रसंगी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडलाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडणार असून यावेळी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या विविध प्रकारचे कर्ज प्रकरणे तसेच मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


यावेळी आर.पी.आय सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, कार्याध्यक्ष सोमनाथ भोसले,म्हाडाचे प्रदेश सरचिटणीस युवराज सावंत,संघटन सचिव चंद्रकांत वाघमारे,राज्य संघटक सुनिल सर्वगोड,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार वाघमारे,पश्चिम महाराष्ट्र चे संघटक बाळासाहेब कसबे,सचिव आप्पासाहेब जाधव,युवक नेते रवी सरवदे,युवक आघाडी नेते लक्ष्मण रणधीरे,पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे उपाध्यक्ष हनुमंत कसबे, माजी नगरसेवक अरुण भालेराव, टी.एन.गायकवाड,राज्य कमिटीचे उपाध्यक्ष के.डी. कांबळे तसेच जिल्ह्यातील आठवले गटाचे कार्यकर्ते उपस्थित उपस्थित राहणार आहेत.

आर.पी.आय आठवले गटाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक भीमराव मोरे यांनी केले आहे.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा