मंगळवेढ्यात मटका घेणा-यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले,बुकी मालकाचा शोध सुरू - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

मंगळवेढ्यात मटका घेणा-यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले,बुकी मालकाचा शोध सुरू



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-

मंगळवेढा शहरातील आठवडा बाजार येथे अंक आकड्यावर पैशाची पैज लावून घेऊन मुंबई नावाचा मटका खेळीत असताना तानाजी अर्जुन भोसले (वय.६० सप्तश्रृंगीनगर,मंगळवेढा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,आरोपी तानाजी भोसले याने प्रल्हाद शिंदे कमानी जवळ आडोशाला लाइटच्या उजेडात मुंबई मटका आकड्यावर पैशाची पैज लावत मटका घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे असिफ लतीब शेख यांनी पकडून त्याच्याविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवेढा शहरात मुंबई मटका घेताना एकास पकडण्यात आले आहे. त्यांचा मुख्य म्होरक्यास बुकी मालकाचा पोलीस शोध घेऊन त्याला ही लवकरच गजाआड करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मंगळवेढा बनले अवैध धंद्यांचे माहेरघर

मंगळवेढा हे अवैध धंद्याचे माहेरघर बनले आहे.या भागात रासरोस गावठी दारू विक्री केली जाते.त्याचबरोबर मटक्याचे आकडे उघड घेतले जात आहेत आणि तिरट नावाचा जुगार खेळला जात आहे.

सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले असताना त्या आदेशाला हरताळ फासला जात आहे.सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे अवैध धंद्याच्या विरोधात असले तरी त्यांना अंधारात ठेवून संबंधित पोलीस आपले उखळ पांढरे करून घेत आहेत.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा