मंगळवेढा वेधने मंगळवेढयाचा अचुक वेध घ्यावा ः ज्ञानदेव जावीर - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

मंगळवेढा वेधने मंगळवेढयाचा अचुक वेध घ्यावा ः ज्ञानदेव जावीर

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

साप्ताहिक मंगळवेढा वेध ने मंगळवेढयाचा अचुक वेध घेत पत्रकारिता करावी असे प्रतिपादन होलार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर यांनी व्यक्त केले.
सा.मंगळवेढा वेध च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त मरवडे येथील लतीफभाई तांबोळी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष लतिफ तांबोळी, प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य संपर्क प्रमुख सुरेश पवार, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब सासणे, सोलापूर शहराध्यक्ष, मंंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, मंगळवेढा तालुका पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष मोहन माळी यांचेसह भिमराव मोरे, आशिषकुमार सुना आदि उपस्थित होते.


जावीर म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय पत्रकार देत असतात. आत्मविश्वास वाढवण्याचे कामही पत्रकारच करतात. आज समाजातील चांगल्या वाईट घटना या पत्रकारांमुळेच जगाला कळतात. त्यामुळेच पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणले जाते. प्रत्येक पत्रकार आपापल्या वर्तमानपत्राचे काम प्रामाणिकपणे करून समाजाला नवनवीन अशा घडत राहणार्‍या घटना दाखवत असतो व समाजाचा वेध घेत असतो. त्याच पद्धतीने मंगळवेढा वेधनेही मंगळवेढयाच अचुक वेध घ्यावा असे ते म्हणाले.
यावेळी यशवंत पवार, लतिफ तांबोळी, सुरेश पवार, भिमराव मोरे आदिंनीही आपले मनोगत व्यक्त केले.


या कार्यक्रमात मंगळवेढा तालुका पत्रकार संघ व पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सर्व पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते हेल्मेटचे वाटप करण्यात आले व पत्रकार संघटनांच्या नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी लतिफ तांबोळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आणि शिक्षक नेते सुरेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

प्रारंभी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन दिगंबर भगरे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक हैदर केंगार, सुत्रसंचालन अक्षय टोमके यांनी केले तर शेवटी संपादक शिवाजी केंगार यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास मंगळवेढा तालुका साप्ताहिक संपादक संघटनेचे अध्यक्ष समाधान फुगारे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्रीकांत मेलगे, प्रमोद बिनवडे,साप्ताहिक संपादक संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश केंगार, म्हाळाप्पा शिंदे, श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय भगरे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश मासाळ, पत्रकार तानाजी चौगुले, राजेंद्रकुमार जाधव, विलास काळे, दत्ता कांबळे, संभाजी मस्के, बिराप्पा भंडगे, बापु मासाळ, शहिदा पटेल, होलार समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किसन भजनावळे, उमाकांत काशिद, गजानन पाटील, सचिन चौगुले, रतिलाल केंगार, मल्लू बिराजदार, मिलिंद ढावरे, वसंत केंगार, समाधान भंडगे, समाधान ऐवळे,  आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.
-----------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा