मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे-बालाजीनगर रोडवरती पंढरपूर कडे वारीसाठी निघालेल्या कर्नाटक बसचा पाटा तुटल्याने बस खड्यात पडून बसमधील सुमारे ४० वारकरी जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पंढरपूर येथे माघ वारीसाठी बस वारकरी घेऊन पंढरपूर कडे जात असताना बसचा पाटा तुटल्याने बस रोडच्या कडेला असलेल्या खड्यात गेली व बसमधील असलेले सुमारे ४० वारकरी किरकोळ जखमी झाले होते. त्यांना मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा