मंगळवेढ्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ. - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

मंगळवेढ्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ.



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-

मंगळवेढा तालुक्यातील अकोला-गुंजेगाव रोडवरील अकोला स्मशानभूमी जवळील ओढ्यात अज्ञात ४५ वर्षीय अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.




याबाबत सविस्तर माहिती अशी की,अकोला येथून गुजेंगाव येथे जाणाऱ्या रोडवरती स्मशानभूमी जवळील ओढ्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह  दुचाकीसह आढळला आहे.

अद्यापपर्यंत त्याची ओळख पटली असून पोलीसांनी त्याच्या मोबाईलवरून शोध घेण्यास सुरुवात केली आहे.


पुलावरून दुचाकीवरून जात असताना दुचाकी ओढ्यात पडून त्याच्या मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील गोडगी व पोलीस नाईक अमर सुरवसे यांनी घटनास्थळी भेट देऊन जागेचा पंचनामा केला आहे.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा