मंगळवेढा तालुक्यात चोरीच्या घटनेत वाढ
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील उत्तम जाधव या शिक्षकाचे घर फोडून अज्ञात चोरट्याने ७१ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक अशी की , उत्तम बाजीराव जाधव (रा.मरवडे,ता.मंगळवेढा) या शिक्षकाच्या मरवडे येथील घरात २७ जून रोजी रात्रौ १०. ३० ते २८ जून रोजी पहाटे ५ दरम्यान अज्ञात चोरट्यांने घराच्या टेरेसवर प्रवेश करून घराच्या दरवाज्याची कडी काढून आत प्रवेश करून लोखंडी कपाट कशाने तरी तोडून त्यातील ६० हजार किंमंतीचे चार तोळे सोन्याचे गंठण , पाच हजार रूपये किमंतीचा मोबाईल हँडसेट , त्यातील सीम कार्ड व १००० हजार किंमतीचे टायटनचे
घड्याळ असा एकूण ७१ हजार रूपये किंमतीचा ऐवज मुद्दाम लबाडीने व फिर्यादीच्या संमतीविना चोरून नेला.
याची फिर्याद उत्तम जाधव यांनी मंगळवेढा पोलीसांत दिली असून पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध भा.दं.वि.कलम ४५७ , ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय गोवे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा