मंगळवेढ्यात चारा छावणी उघडताना खोटे प्रतिज्ञापत्र सादर ; चेअरमन,सचिवांसह १० जणांवर गुन्हे दाखल - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, ४ जुलै, २०१९

मंगळवेढ्यात चारा छावणी उघडताना खोटे प्रतिज्ञापत्र सादर ; चेअरमन,सचिवांसह १० जणांवर गुन्हे दाखल

मंगळवेढ्यात चारा छावणी चालकात खळबळ







मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

जनावरांसाठी चारा छावणी उघडताना छावणीसंदर्भात पुर्वी कुठलाही गुन्हा व गुन्हयाची संबंधित व्यक्तीशी आमच्या कुटुंबाचा कसलाही संबंध नसलेबाबत खोटे प्रतिज्ञापत्र व शपथपत्र सादर करून स्वतःच्या फायदयाकरीता छावणी उघडून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शिरशी ( मोरेवस्ती ) येथील ज्योतिर्लिंग सहकारी दुध उत्पादक सहकारी संस्थेचे सचिव रामचंद्र प्रभाकर मोरे , चेअरमन कुंडलिक बापू मोरे , सदस्य प्रभाकर बापू मोरे , रामचंद्र पांडुरंग गायकवाड , मनोहर लक्ष्मण बळछत्रे , निवृत्ती ज्ञानू कांबळे , गजाराम बापू मोरे , पल्लवी रामचंद्र मोरे , छाया कुंडलिक मोरे , सिध्देश्वर शंकर गायकवाड या दहा जणांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 




या घटनेची हकिकत अशी , मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाच्यासाठी छावण्या उघडल्या आहेत . तत्पुर्वी तालुक्यातून छावण्या उघडण्यासाठी विविध संस्थेकडून जिल्हा प्रशासन - सन २०१२ - १३ , २०१३ - १४ मध्ये उघडण्यात आलेल्या छावण्यांमध्ये अनियमिततेबाबत संस्थेवर संचालक , सचिव , चेअरमन यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते . सन २०१९ मध्ये चारा छावणी मागणी प्रस्तावामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करून घेण्यात आले आहे . यामध्ये सदर अटी व शर्तीच्या अनुशंगाने जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव दाखल करताना सहजिल्हाधिकारी यांनी तसा आदेश केला होता. 




मंगळवेढा तालुक्यात सुरु असलेल्या छावण्यांची धर्मादाय आयुक्त सोलापूर , सहाय्यक निबंधक सहकारी संस्था , मंगळवेढा , सहाय्यक निबंधक दुग्ध सहकारी संस्था , सोलापूर यांच्यामार्फत तपासणी केली असता वरील आरोपीवर सन २०१२ - १४ मध्ये गुन्हे दाखल झाल्याचे निदर्शनास आले असून याचा अहवाल जिल्हाधिका - यांना सादर के ल्यानंतर संबंधित संस्थेच्या पदाधिका - यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिल्याने आंधळगांव मंडलचे मंडलाधिकारी सत्यवान घुगे यांनी बुधवारी रात्री उशीरा मंगळवेढी पोलिस ठाण्यात ज्योतिर्लिंग सहकारी दुध संस्थेच्या पदाधिका - यांवर फिर्याद दाखल केली . दरम्यान अन्य काही संस्थांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने उर्वरीत माहिती व जेईपर्यंत उपलब्ध होवू शकली नाही . या कारवाईने छावणी चालकात खळबळ उडाली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा