मंगळवेढ्यात एकाच रात्री दोन घरफोड्या ; ६६ हजारांचा मुद्देमालावर चोरट्यानी मारला डल्ला - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, १० जुलै, २०१९

मंगळवेढ्यात एकाच रात्री दोन घरफोड्या ; ६६ हजारांचा मुद्देमालावर चोरट्यानी मारला डल्ला

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी परिसरातील लक्ष्मी नगर येथे एकाच रात्री दोन घरफोडया करून चोरटयांनी ६६ . हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेले . या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस त्या चोरटयाचा शोध घेत आहेत. 




याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,कचरेवाडी परिसरातील लक्ष्मीनगर येथे रहाणारे फिर्यादी शिवाजी शंकर माने यांचे दि . ७ च्या मध्यरात्री बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाट उचकटून कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले ६२ हजार रुपये किमतीचे विविध दागिने तसेच फिर्यादीच्या शेजारी रहाणारे गोपाळ महादेव हेंबाडे हे घराचा दरवाजा उघडा ठेवून त्यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून पत्र्याच्या पेटीत ठेवलेले २४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत . 

या चोरीचा अधिक तपास पोलिस नाईक विक्रमसिंह राठोड करीत आहेत.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा