मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
शेततळ्यासाठी घेतलेले साडेचार लाखांचे कर्ज स्वतःसाठी वापरून फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी
बापू आप्पा नागणे व सागर बापू नागणे(रा. खोमनाळ ता.मंगळवेढा) या दोघांवर सोलापुरात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,बापू आणि सागर नागणे या दोघांनी रेल्वे लाईन येथील सस्टेनेबल ॲग्रो कमर्शियल फायनान्स कंपनी कडून कृषी प्रकल्प शेततळे खोदकामासाठी साडेचार लाखांचे कर्ज घेतले होते.
मात्र चौकशीअंती त्यांनी ती रक्कम स्वतःसाठी वापरल्याचे लक्षात आले यावरून माधव चव्हाण यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राठोड करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा