मंगळवेढ्यात गळफास घेऊन दोघांची आत्महत्या;तालुक्यात खळबळ - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, २५ जुलै, २०१९

मंगळवेढ्यात गळफास घेऊन दोघांची आत्महत्या;तालुक्यात खळबळ



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे दहा तासात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे

याबाबत अधिक माहिती अशी की बालाजी मुकुंद वाघ (वय 30 रा.ब्रह्मपुरी) याने 23 जुलै रोजी रात्री 11.30 वा अज्ञात कारणाने घराच्या पाठीमागील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर रेवन चव्हाण यांनी पोलिसात दिली असून आदी तपास फौजदार दत्तात्रय गोवे हे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत संजय बजरंग खताळ (वय.41 ब्रह्मपुरी) याने बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास ब्रह्मपुरी येथील राहत्या घरी दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केले याची फिर्याद मयताचा भाऊ राजेंद्र खताळ याने पोलिसात दिली असून अधिक तपास पोलिस नाईक धानगोंडा हे करीत आहेत.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा