Mangalwedha Times News:-
डॉ.पंजाबराव शिक्षण हक्क परिषद सोलापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत विराज दिगंबर भगरे याने जिल्हयात व्दितीय क्रमांक पटकावला.
विराज हा न.पा.कन्या शाळा नं. 1 मध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असून त्याला वर्गशिक्षिका आशा वाले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल मुख्याध्यापक रघुनाथ खरात,गुरुकूलचे दामाजी माळी,पंजाबराव शिक्षण परिषदेचे सिध्देश्वर पवार आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा