मंगळवेढा येथून कॉलेज तरूणी बेपत्ता - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २८ जुलै, २०१९

मंगळवेढा येथून कॉलेज तरूणी बेपत्ता




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी या गावातील 19 वर्षीय कॉलेज तरूणी कॉलजेला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. ती परत न आल्याने बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या भावाने पोलीसात दिली असून. पोलीस त्या तरूणीचा शोध घेत आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,कचरेवाडी येथील कॉलेज युवती दि.26 रोजी सकाळी 11.30 वाजता कचरेवाडी येथील राहते घरातून कॉलेजला जाते असे सांगून बाहेर पडली. रात्री उशीरा पर्यंत ती घरी नाही. 

कुटुंबियानी सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. रंगाने गोरी, अंगाने सडपातळ, नाक मध्यम, चेहरा गोल, अंगात नेसणेस फिकट गुलाबी ओडनी व मेहंदी रंगाचा पंजाबी सलवार कुडता असुन उंची 163 से.मी असल्याचे भावाने दिलेल्या खबर मध्ये म्हटले आहे.

या वर्णनांची व्यक्ती कोणाच्या नजरेस आल्यास मंगळवेढा पोलीसांशी संर्पक साधावा असे अवाहन पोलिसांनी केले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा