रतनचंद शहा सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

रतनचंद शहा सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


रतनचंद शहा सहकारी बँकेच्या वतीने बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार सांगली येथे महापुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात आला आहे. 


पूरग्रस्तासाठी पाच हजार लोकांना पुरेल एवढे अन्नधान्य, भाजीपाला, औषधे,  एक हजार टाॅवेल, एक हजार दुध पाकीट, पंचवीस किलो शेंगा चटणी, एक हजार खोबरेल तेल बाटली, एक हजार ओडोमॉस तसेच ,लहान मुलांच्या उपचारासाठी आवश्यक असणारे मेडिसिन देण्यात आले. 

सांगली येथील एका फाऊंडेशनच्या माध्यमातून ही मदत त्या गरजवंतांना पोहोचली जाणार आहे रतनचंद शहा बँकेच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम घेण्यात येतात कोल्हापूर सांगली सातारा भागाला महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे त्या ठिकाणी तात्काळ दिलासा देण्यासाठी बँकेने संचालक मंडळाची बैठक आयोजित करून त्यात मदतीचा निर्णय घेतला आहे.रविवारी सकाळी सांगलीकडे रवाना झाले.

यावेळी बँकेचे चेअरमन राहुल शहा, अभय हजारे रमेश जोशी,बजरंग ताड,आबा माळी,लक्ष्मण नागणे,मुझफर काझी,डी.के दत्तू,सिद्धेश्वर गोवे, सह संचालक अरविंद नाझरकर, राजेंद्र कट्टे हरिदास राजगुरू दीपक तटपटे, दयासागर देशमाने  दत्तात्रय शिर्के सुभाष औंधकर बसु सलगरकर श्रीकांत नाझरकर विजय चेळेकर विवेक चिंचकर साजीत रोंगीकर चंद्रकांत कोंडूभैरी संदीप पुळुजकर बटु मुजावर गणेश भगरे आदी कर्मचारी उपस्थित होते.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा