मंगळवेढ्यात भीमा नदीच्या पुराच्या पाण्यात बुडून वृद्धेचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

मंगळवेढ्यात भीमा नदीच्या पुराच्या पाण्यात बुडून वृद्धेचा मृत्यू





मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा येथील आलेल्या भीमा नदीच्या पुरात धुणे धुण्यासाठी गेलेल्या सिंधुबाई पंडित पुजारी (वय.५५ रा.तामदर्डी ता.मंगळवेढा) या वृद्धेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली आहे.


याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तामदर्डी येथील महंमद समशोद्दीन इनामदार यांचे शेतातील पुराच्या पाण्यात मयत वृद्ध महिला सिंधुबाई पंडित पुजारी ही कपडे धुण्यासाठी गेली असता पुराच्या पाण्यात पाय घसरुन पडुन बुडुन मयत झाली आहे. 

दरम्यान महंमद इनामदार हे पुराच्या पाण्याची स्थिती पाहण्यासाठी गेले असता एका काटेडी जुडपात साडी अडकल्याने ही घटना लवकर उघडकीस आली आहे.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा