सिद्धापूर-वडापुर बंधाऱ्याची एक बाजू गेली वाहून;ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून चिंता - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

सिद्धापूर-वडापुर बंधाऱ्याची एक बाजू गेली वाहून;ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून चिंता




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर जवळील वडापूर बंधाऱ्याची एक बाजू वाहून गेल्यामुळे हा बंधारा रिकामा होऊन हजारो हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त होणार असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे.


           
उजनी व वीर धरणातील ज्यादा झालेले पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नदीकाठी पूरपरिस्थिती निर्माण झाली. वडापूर बंधारा भरून वाहत असताना असल्यामुळे सिद्धापूर ते वडापूर या दोन गावाचा संपर्क तुटल्यामुळे या भागातील मंगळवेढा - दक्षिण सोलापूर या दोन तालुक्याचे दळणवळण थांबले होते.आणि शेतकऱ्यांना दूरवरून जावे लागले.अशा परिस्थितीत आज नदीपात्रात पाणी कमी झाल्यामुळे बंधाऱ्याच्या खाली पाणी जाऊ लागताच नागरिकांच्या बंधाऱ्याची पूर्वेकडे बाजू वाहून गेल्याचे लक्षात आले जोपर्यंत हा वाहून गेलेला भराव नीट केला जात नाही तो भागातील वाहतूक बंद राहणार आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी बेगमपुर हून जाताना जादा पैसे मोजावे लागते.शिवाय कारखान्याचा गाळप हंगामात जकराया कारखान्याकडे जाणारी वाहने देखील त्यांना दूरवरच्या अंतर कापावे लागणार आहे.त्यामुळे या वाहून गेलेल्या बंधाऱ्याचे तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे.अन्यथा बंधाऱ्यातील पाणी पूर्ण रिकामी होऊन बंधारा कोरडा पडल्यास या भागातील शेतकय्रानी काढलेले कर्ज फिटणार नसल्याने शेतक-यांना कर्जबाजारी व्हावे लागणार आहे.पुरामुळे घायाळ शेतकय्राना बंधाय्रातील पाणी गळतीने आणखीनच घायाळ व्हावे लागणार आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा