अक्षरगंध साहित्य मंचच्या जिल्हाध्यक्षपदी निलकंठ कुंभार - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

अक्षरगंध साहित्य मंचच्या जिल्हाध्यक्षपदी निलकंठ कुंभार




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

अक्षरगंध साहित्य मंचची बैठक संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली होवून अक्षरगंध साहित्य मंचच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी प्रायमाचे प्राचार्य निलकंठ कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीची सूचना सुरेश माळी यांनी मांडली,त्यास समाधान फुगारे यांनी अनुमोदन दिले.सुरुवातीस संस्थापक दिगंबर भगरे यांनी या मंचची ध्येयधोरणे प्रास्ताविकात सांगून वर्षभरात कोणकोणत्या कार्यक्रमाचे नियोजन करावयाचे याची माहिती सांगितली.

निवडीनंतर नूतन जिल्हाध्यक्ष निलकंठ कुंभार यांचा कवी प्रा.शशिकांत जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या बैठकीस कवी अशोक उन्हाळे,प्रा.नवनाथ सावळे,विलास मासाळ,संतोष ढावरे,सुरेश माळी,प्रमोद बिनवडे,नितीन बाभळे,रविंद्र लोकरे आदी उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा