मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथील वारी परिवार, व्यापारी महासंघ,माजी सैनिक संघटना मंगळवेढा. यांच्यावतीने सांगलीतील पूरग्रस्तांसाठी अन्न, सुका खाऊ, शुध्द पाणी असे साहित्य देण्यात आले.
सांगलीमध्ये हिराबाग वॉटर स्टेशनजवळील परिसर, मनपा शाळा नंबर 23, मराठा सेवा संघ, नवमहाराष्ट्र हायस्कूल कुपवाड, जागृती डीएड कॉलेज, बुधगाव, कुपवाड, नांद्रे, भिलवडी, धामणी तसेच कांतीलाल पुरुषोत्तम शहा प्रशाला विश्रामबाग जनकल्याण समिती,मनपा शाळा नंबर सावली निवारा केंद्र यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर याठिकाणी पूर बाधित लोकांना साहित्य वाटप करण्यात आले.
पालकमंत्री सुभाष देशमुख,आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंगळवेढ्यातील संस्थाचे कौतुक केले. यावेळी अरूण शांताराम किल्लेदार, मल्लय्या स्वामी मेजर, सतीश हजारे,सागर शहा,अरुण गुंगे, सतीश दत्तू ,प्रमोद हेंबाडे, स्नेहल गौंडाजे आदींनी साहित्य वाटप केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा