मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अक्षरगंध साहित्य मंचच्या वतीने बुधवार दि.14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पुर्वसंध्येला सायं.4.30 वाजता प्रायमा शिक्षण संकुल, खंडोबा गल्ली येथे देशभक्तीपर कविसंमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती अक्षरगंधचे जिल्हाध्यक्ष निळकंठ कुंभार यांनी दिली.
या कविसंमेलनात मंगळवेढा व परिसरातील कवी देशभक्तीपर हिंदी व मराठी कविता सादर करणार असून अशा प्रकारचा प्रयोग मंगळवेढयात प्रथमच होत आहे.
या कवि संमेलनात नवोदित कवींनाही देशभक्तीपर कविता सादर करण्याची संधी देण्यात येणार असून सर्व काव्यप्रेमींनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन निळकंठ कुंभार यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा