मंगळवेढ्यात गाडी घसरून २० वर्षीय तरुण ठार;एकजण गंभीर जखमी - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

मंगळवेढ्यात गाडी घसरून २० वर्षीय तरुण ठार;एकजण गंभीर जखमी




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पल्सर गाडीवरून सोलापूर टोल नाक्याकडे जात असताना गाडी स्लिप होऊन राजविरसिंग गुविरसिंग रजपुत (वय.२०,रा.बार्शी,जि.सोलापुर) हा तरुण जागीच ठार झाला असून प्रध्युग्न दारासिंग रजपुत हा युवक गंभीर जखमी झाला आहे.ही घटना मंगळवेढा-सोलापूर बायपासरोड डोंगरे यांच्या घरामसोर घडली आहे.



याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,शुक्रवार दि.३० रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास मंगळवेढा-सोलापूर रोडच्या बायपास ने टोल नाक्याकडे पल्सर दुचाकीवरून जात असताना मयत राजवीर सिंग हा गाडी चालवीत होता.

अचानक गाडी स्लिप होऊन खाली पडल्याने राजवीरसिंग याच्या डोक्यास जबर मार लागल्याने गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वी मयत झाला आहे.

तर प्रध्युग्न दारासिंग रजपुत हा किरकोळ मुक्का मार लागून जखमी झाला आहे.मंगळवेढा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद अकस्मात मयत म्हणून दाखल करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव कोळी हे करीत आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा