दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाचा मंगळवेढ्यात आज शेतकरी मेळावा - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाचा मंगळवेढ्यात आज शेतकरी मेळावा



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

राज्याचे दुग्धविकास मंत्री ना.महादेव जानकर यांच्या उपस्थितीत मंगळवेढा येथे भव्य शेतकरी मेळावा होणार असून ना.जानकर यांचा भव्य नागरी सत्कारही करण्यात येणार आहे.या मेळाव्यात राजमाता अहिल्यादेवी होळकर शेळी - मेंढीपालन महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले व महात्मा फुले आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते बापूसाहेब मेटकरी यांनी दिली. 




गेल्या अनेक वर्षांपासून मंगळवेढा तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो मंगळवेढ्याची दुष्काळग्रस्त तालुका ही ओळख पुसून काढण्यासाठी या तालुक्याचा पाणीप्रश्न सुटला पाहिजे.तसेच सुशिक्षित बेकारांची प्रश्न सुटले पाहिजेत धनगर आरक्षण संबंधीच्या समाजबांधवांच्या मागण्या , धनगर समाजासह सर्वच बहुजनांना न्याय मिळणे गरजेचे असल्याने या सर्व मागण्या ना.जानकर यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आज  ३१ ऑगस्ट रोजी मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौकात मारुती पटांगणावर होणाऱ्या भव्य अशा शेतकरी मेळाव्यात मंगळवेढा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे व बापूसाहेब मेटकरी यांनी केले आहे.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा