मंगळवेढ्यातील तरुणाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू;तिरुपतीला दर्शनासाठी जाताना घडली घटना - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

मंगळवेढ्यातील तरुणाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू;तिरुपतीला दर्शनासाठी जाताना घडली घटना



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी जात असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील बालाजी नगर येथील महेश धोंडीराम जाधव या भाविकाचा आंध्र प्रदेशातील येरगुंठला रेल्वे स्टेशनपासून वीस कि.मी अंतरावर दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून अपघाती मृत्यू झाला.
       



याबाबत सविस्तर हकीकत अशी की तालुक्यातील बालाजी नगर येथील महेश जाधव (वय.२६) व त्याचे मित्र दर वर्षी बालाजीच्या दर्शनासाठी जात असतात यंदा जवळचे नातेवाईक आजारी असल्याच्या कारणावरून मित्रांनी नंतर जायचे ठरवले पण महेश हा एकटाच मागून येण्यास सांगून पुढे गेला.

वेगातील रेल्वेतून रात्री झोपेतून पडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलीसांनी व्यक्त केला.सकाळी रेल्वे रूळाशेजारी मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत होता पण खिशातील आधार कार्डावरून मृतदेहावरून ओळख  पटली.आदल्या दिवशी रात्री नातेवाईकांना केलेल्या फोन वर फोन नंबरवरून नातेवाईकांशी संपर्क साधला.

आज सायंकाळी शवविच्छेदनानंतर प्रेत ताब्यात घेतले असले तरी तो रेल्वेतून पडून घात झाला की अपघात झाला याबाबत ग्रामस्थांमध्ये साशंकता असून याबाबत योग्य तपास करावा अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे.या  तरूणांच्या अपघाती निधनाने जाधव कुटूंबाचा आधारवड हरपला.त्याच्या पश्चात आई वडील तीन बहिणी असा परिवार आहे.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा