शिवसेनेचा मंगळवेढ्यात उद्या भव्य शेतकरी मेळावा - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१९

शिवसेनेचा मंगळवेढ्यात उद्या भव्य शेतकरी मेळावा


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा

पंढरपूर व मंगळवेढा या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शनिवार दि. ३ ऑगस्ट रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

राज्याचे जलसंधारण मंत्री ना.प्रा. तानाजी सावंत हे या मेळाव्याला उपस्थित राहून शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. 



याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व नेतेही उपस्थित राहणार आहेत. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता त्वरित मिळावी, म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्याला नियमितपणे मिळावे, म्हैसाळ योजनेमध्ये लवंगी, आसबेवाडी, सलगर( बु ), सलगर (खु), शिवणगी, सोड्डी, येळगी व हुलजंती या गावाचा नव्याने समावेश व्हावा, भीमा नदीला कालव्याचा दर्जा देवून शेतीला पाणी सोडण्याची कायमची तरतूद व्हावी, शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, रब्बी दुष्काळी निधीत मंगळवेढा तालुक्याचा समावेश व्हावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे, दुष्काळी भागातील शेतकर्यांचे वीज बिल माफ व्हावे यासह शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने भव्य अशा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे या दिली आहे. 

मंगळवेढा येथे आठवडा बाजार हा शेतकरी मेळावा संपन्न होणार आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा