मंगळवेढ्याचे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीचा अपघात;शिंदेंची प्रकृती स्थिर - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

मंगळवेढ्याचे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीचा अपघात;शिंदेंची प्रकृती स्थिर



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा येथील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूरजवळ अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात आनंद शिंदे सुखरुप बचावले असून गाडीचं मोठं नुकसान झाला आहे. आनंद शिंदेंची प्रकृती स्थिर आहे.




मुंबईहून इंदापूरमार्गे सांगोला-मंगळवेढा कडे जात होते. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ वरकुटे इथे पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला. अपघातात आनंद शिंदे यांच्या पायाच्या तळव्याला दुखापत झाली आहे. तर गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. इंदापूरमध्ये डॉ अविनाश पाणबुडे यांच्या खासगी दवाखान्यात उपचार करुन शिंदे मंगळवेढाकडे रवाना झाले आहेत.












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा