मंगळवेढा नगरपरिषदेस बहुउद्देशीय इमारती करिता वैशिष्टयपुर्ण योजनेतून दोन कोटी मंजूर :अजित जगताप - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

मंगळवेढा नगरपरिषदेस बहुउद्देशीय इमारती करिता वैशिष्टयपुर्ण योजनेतून दोन कोटी मंजूर :अजित जगताप



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


मंगळवेढा नगरपरिषदेस बहुउद्देशीय इमारती करिता 6 कोटी रूपये निधी मिळावा याकरिता  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले होते. तसेच मुख्यमंत्री यांना पंढरपूर येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचेसमवेत नगरसेवकांनी या कामाकरिता निधी देण्याची मागणी केली होती .

तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही सदर निधी मागणी प्रस्तावास शिफारस केली होती , सदर मागणीची दखल घेवून मुख्यमंत्री यांनी नगरविकास विभागात निधी देणे बाबत आदेश दिले होते.  त्यानुसार शासनाच्या वैशिष्टयपुर्ण योजनेतुन सन 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये पहिला टप्प्यात 2 कोटी रूपये मंजूर झाल्याची  माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप यांनी दिली.



       
गेल्या महिन्यामध्ये मुंबई येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नगरपरिषदेच्या बहुउद्देशीय इमारत व एक्सप्रेस फिडर करिता निधी मिळावा याकरिता आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, नियोजन समिती सदस्य अजित जगताप, भाजपचे शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल  तसेच उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले , नगरसेवक प्रविण खवतोडे, भाजपचे कोशाध्यक्ष मा. दिपक माने, विजय बुरकुल  बबलु सुतार यांनी भेटुन सदर कामाकरिता निधी मागणी केलेली होती. 

बहुउद्देशीय इमारतीचे अंदाजपत्रक 6 कोटी रूपयेचे असुन प्रत्येक वर्षी 2 कोटी असे टप्याटप्याने 6 कोटी निधी नगरपरिषदेस प्राप्त होणार असुन लवकरच सभेसमोर मंजूरी घेवून या बाबतची निविदा प्रक्रिया पुर्ण करून बहुउद्देशीय सभागृहाचे काम सुरू करण्याकरिता सर्व पदाधिकारी प्रयत्नशिल राहणार असुन सदर बहुउद्देशीस सभागृह 700 आसन क्षमतेचे असुन सर्व सोयी-सुविधा युक्त वाताणुकूलित सभागृह होणार आहे.  हे काम पुर्ण झालेनंतर मंगळवेढे करांना विविध कार्यक्रमासांठी चांगली सोय या माध्यमातून होणार आहे. 

सदर बहुउद्देशीय इमारतीचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे  महत्वपूर्ण काम मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले आहे.  यापुर्वीचा जुना टॉऊनहॉल पाडून त्याू ठिकाणी बहुउद्देशीय सभागृह बांधण्याकरिता मंगळवेढा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजूरी दिली असुन शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, सार्व. बांधकाम समिती सभापती सब्जपरी   मकानदार, महिला व बालकल्याण समिती सभापती सुमन  शिंदे, नियोजन आणि विकास समिती सभापती प्रविण खवतोडे, आरोग्य समिती सभापती राजश्री  टाकणे, विरोधी पक्षनेते निर्मला माने, व नगरसेवक संकेत खटके, नगरसेविका अनिता नागणे, भागीरथी नागणे, लक्ष्मी म्हेत्रे, पारूबाई जाधव, रतन पडवळे, नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी, राहुल सावंजी, बशीर बागवान यांनी प्रयत्न केले.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा