डोक्यात दगड पडल्याने मंगळवेढ्यातील कामगाराचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

डोक्यात दगड पडल्याने मंगळवेढ्यातील कामगाराचा मृत्यू



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

विहिरीचे काम करीत असताना डोक्यात दगड पडल्याने संभाजी दगडू दोडके (वय.४०,रा.तळसंगी ता.मंगळवेढा) या कामगाराचा मृत्यू झाला आहे.ही घटना मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास सतिश रंगनाथ हजारे यांचे शेतात खोमनाळ रस्ता हजारे मळा येथे घडली आहे.




याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सतीश हजारे यांच्या शेतातील विहीरीतील गाळ काढत शेतातील विहीरीचे काम करीत असताना यांचे डोक्यात दगड पडल्याने तो जखमी होवून मयत झाला आहे . 

याची खबर सतिश हजारे यांनी दिली असून अकस्मात मयत दाखल करून मयताचा जाहिर रिपोर्ट तहसिलदार यांना पाठवुन देण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक बापूसाहेब पवार हे करीत आहेत.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा