मंगळवेढा नगराध्यक्षांच्या अविश्वास ठरावावर मुंबईत आज सुनावणी - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

मंगळवेढा नगराध्यक्षांच्या अविश्वास ठरावावर मुंबईत आज सुनावणी




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.अरूणा माळी यांच्यावर सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता , यावर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी नगराध्यक्ष व सदस्यांची चौकशी करून शासनाला अहवाल सादर केला आहे.यावर आता नगरविकास राज्यमंत्री आज ५ सप्टेंबर रोजी सुनावणी घेणार आहेत. 

यामुळे नगराध्यक्षा माळी यांच्या पदाबाबतचा निर्णय आज ५ सप्टेंबर रोजी होणार आहे. राज्यमंत्र्यांनी अविश्वास ठराव मंजूर केल्यास नवीन नगराध्यक्ष निवडला जाणार आहे . जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांची सुनावणी घेण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.यामुळे आता राज्यमंत्री यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा