मंगळवेढ्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

मंगळवेढ्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा शहरातील संत दामाजी मंदिरातील समोरील मंडपात अंदाजे ६५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृत इसमाचे नाव अद्याप स्पष्ट झाले नाही पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,अनोळखी पुरुष जातीचे मयत हे संत दामाजी मंदिरातील समोरील मंडपात बेवारस अवस्थेत कोणहीती हालचाल न करता पडलेला आढळून आला असल्याने अधिक माहिती घेतली असता मयत अवस्थेत मिळून आला असल्याची खबर सतीश वसंत पाटील यांनी दिली असून अधिक तपास पोलीस नाईक नामदेव कोळी हे करीत आहेत.

मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून सदरचा मृतदेह मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आली आहे. मृत व्यक्तीसंदर्भात कोणास अधिक माहिती मिळाल्यास तातडीने मंगळवेढा पोलीस स्टेशनला ०२१८८-२२०३३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा