मंगळवेढा नगराध्यक्षांच्या अविश्वास ठरावावरील सुनावणी लांबणीवर - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

मंगळवेढा नगराध्यक्षांच्या अविश्वास ठरावावरील सुनावणी लांबणीवर



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी नगरपालिकेकडे मागणी केलेली कागदपत्रे न मिळाल्यामुळे नगरविकास राज्यमंत्र्यांकडे अविश्वास ठरावावरची सुनावणी लांबणीवर पडली आहे.

नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्यावर सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता . यावर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी नगराध्यक्ष व सदस्यांची चौकशी करून शासनाला अहवाल सादर केला आहे. 

यावर नगरविकास राज्यमंत्र्यांनी ५ सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवली होती . यावेळी नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्या वतीने अॅड . अशोक काजने यांनी सुनावणीदरम्यान आम्ही नगरपालिकेकडे याविषयी विविध कागदपत्रांची मागणी केली आहे , मात्र त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचे राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले . यावर राज्यमंत्र्यांनी विचारणा केली व कागदपत्रे देण्यात यावी , अशी सूचना केली .







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा