मंगळवेढयात पूर्वीचा राग मनात धरून युवकावर प्राणघातक हल्ला - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१९

मंगळवेढयात पूर्वीचा राग मनात धरून युवकावर प्राणघातक हल्ला


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

तीन वर्षापुर्वी झालेल्या अपघातात चुलत्याचा मृत्यू झाल्याचा राग मनात धरून पुतण्याने एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना भगरे गल्ली येथे घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की ,गेल्या तीन वर्षापुर्वी आरोपीचा चुलता सुरेश मारुती चव्हाण हा फिर्यादी दत्तात्रय सुधाकर शिंदे (वय २४रा . एकवीरा माळ,मंगळवेढा) चालवित असलेल्या पिक अप वाहनाच्या अपघातात मयत झाल्याचा राग मनात धरून मयताचा पुतण्या तुकाराम आण्णा चव्हाण (रा .भगरेगल्ली ) याने रविवार दि . २० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ . ३० च्या सुमारास दत्तात्रय शिंदे याला जेवणासाठी घरी बोलावून घेतले व खुरप्याने गळयावर व लोखंडी वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 

यात दत्तात्रय शिंदे हा गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

याप्रकरणी आरोपी तुकाराम चव्हाण विरूध्द भा. दं.वि.सं कलम ३०७ ,अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४(आय) १ (एस) याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील हे करीत आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा