मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
विहिरीत पावसाचे पाणी आल्याचे पहात असताना तोल जावून पाण्यात पडून बूडून एका ७५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला.ही घटना खुपसंगी शिवारात घडली असून जगन्नाथ चंदू चौगुले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आकस्मित मयत अशी या घटनेची पोलिसात नोंद झाली आहे.
बातम्यासाठी व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
यातील मयत जगन्नाथ चौगुले हे दि . २३ रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान खुपसंगी गावच्या पाणी पुरवठा विहिरीत पावसाचे पाणी किती आले आहे. हे वाकून पहात असताना तोल जावून ते विहिरीतील पाण्यात पडून बूडून मयत झाले असल्याचे समाधान चौगुले यांनी दिलेल्या खबरीमध्ये म्हटले आहे.
अधिक तपास पोलिस नाईक विक्रमसिंह राठोड हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा